राजकीयसामाजिक

साळशी येथील दलित विकासकामांचा निधी गिळंकृत : उच्च स्तरीय चौकशी व्हावी – भारतीय दलित महासंघ


मलकापूर प्रतिनिधी : साळशी तालुका शाहुवाडी येथील दलित वस्ती मध्ये सन २०२०-२२ मध्ये विविध शासकीय योजनांच्या द्वारे गैरव्यवहार झाला असून, दलित वस्ती विकासासाठी असलेला निधी हा बोगस पद्धतीने गिळंकृत केला आहे. या सगळ्यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी,यासाठी भारतीय दलित महासंघ च्यावतीने श्रीकांत कांबळे हे पंचायत समिती शाहुवाडी च्या प्रांगणात आमरण उपोषण साठी बसले होते. दरम्यान संध्याकाळी हे आमरण उपोषण काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले असाल्याचे समजते.


साळशी तालुका शाहुवाडी इथं दलित वस्ती विकास योजनेचा निधी ग्रामसेवकापासून विस्तार अधिकारी, ठेकेदार पंचायत समिती चे बांधकाम अधिकारी यांची साखळी असून, संपूर्ण भ्रष्टाचारी व्यवस्थेने बोगस बिलाद्वारे शासनाची व दलित समाजाची फसवणूक केली आहे.


तरी साळशी येथील दलित वस्ती मध्ये झालेल्या विकासकामांची उच्चस्तरीय चौकशी करून, निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची ,तसेच बोगस बिलांची चौकशी करून, यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करून, कारवाई करावी, अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!