सावे अत्याचार प्रकरणी वंचित आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
शाहुवाडी : सावे ता. शाहुवाडी येथील बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, व कुटुंबास न्याय मिळावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने शाहुवाडी पोलीस ठाणे चे सहा. पोलीस निरीक्षक, व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.



या निवेदनावर भारतीय बौध्द महासभा शाहुवाडी चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, नितीन कांबळे, संदीप कांबळे, अनिल कांबळे, अनिकेत कांबळे, उत्तम कांबळे, मच्छिंद्र कांबळे, अफजल देवळेकर, विकास कांबळे, गौतम कांबळेआदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.