सावे अत्याचार प्रकरणी शाहुवाडी पोलिसांना रणवीर युवा शक्ती चे निवेदन
बांबवडे ; सावे ता. शाहुवाडी येथील बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे, यासाठी रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती च्या वतीने शाहुवाडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख व तहसीलदार कार्यालयास निवेदन देण्यात आले.


यावेळी युवा शक्ती चे अध्यक्ष समीर पाटील, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, सावे गावाचे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रकाश कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज बंडगर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.