सावे प्राथमिक विद्यामंदिर च्या विकास हजारे सरांचे निधन
बांबवडे : सावे तालुका शाहुवाडी येथील सावे प्राथमिक विद्यामंदिर चे कष्टाळू आणि होतकरू शिक्षक विकास चांगदेव हजारे यांचे आज दि. १६ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजनेच्या दरम्यान निधन झले आहे. सर बांबवडे येथील गणेश नगर मध्ये वास्तव्यास होते.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, ४ जून २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजनेच्या दरम्यान त्यांचा अंबीरा ओढ्याजवळ अपघात झाला होता. एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती. आणि वाहन चालक वाहनासहित पसार झाला होता. दरम्यान त्यांच्या अपघातामुळे त्यांच्या डोक्यातून अधिक रक्तस्त्राव होत होता. त्यांना उपचारार्थ कोल्हापूर इथं दाखल करण्यात आले होते.

परंतु उपचारानंतर सुद्धा त्यांचे आज सकाळी निधन झाले आहे. हजारे सर मुळचे बीड जिल्ह्यातील असून, त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावी नेण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली, तसेच आई-वडील आहेत.

दरम्यान विकास हजारे सरांच्या उपचारासाठी लागणारा खर्च अमाप होता. यासाठी अनेक शिक्षक मंडळींनी त्यांना आर्थिक सहकार्य केले होते. परंतु अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.