“सावे” येथील पिडीत बालिकेच्या कुटुंबाला “खासदार माने” यांची सांत्वनपर भेट
बांबवडे : सावे तालुका शाहुवाडी येथील पिडीत बालिकेच्या कुटुंबियांना खासदार धैर्यशील माने यांनी भेट देवून, अपराध्याला कठोर शासन व्हावे,याकरिता शासनाशी,तसेच पोलीस प्रशासनाशी बोलण्याची ग्वाही यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

शाहुवाडी तालुक्यातील घटना अतिशय निंदनीय असून घृणास्पद आहे. अशी प्रवृत्ती संपली पाहिजे, यासाठी अशा आरोपींना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत या घटनेबाबत बोलणार असल्याची ग्वाही यावेळी खासदार यांनी दिली. त्याचबरोबर पिडीत कुटुंबाला त्यांनी धीर दिला.


यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, शाहुवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती नामदेवराव पाटील, सचिन मूडशिंगकर, भैरवनाथ सेवा संस्थेचे विकास पाटील, यावेळी उपस्थित होते.