” साहेबांच्या ” कट्टर शिवसैनिकांचे यथाशक्ती दातृत्व, “दिवाळीच्या फराळाचे वाटप” : श्री यशवंत पाटील यांना शुभेच्छा
बांबवडे : समाजातील आर्थिक मागासलेल्या घटकांकडे स्वेच्छेनुसार लक्ष देवून त्यांना आर्थिक वस्तू स्वरुपात मदत करणे. आणि त्यात सातत्य ठेवणे, हे अतिशय कठीण काम असते. दुसरी गोष्ट याबाबत कोणतीही अपेक्षा न ठेवणे, हि दुसरी महत्वाची गोष्ट आहे. हा समाजधर्म आहे, आणि तो पाळला आहे एका कट्टर शिवसैनिकाने . त्यांचे नाव आहे, श्री यशवंतराव पाटील, सावर्डे खुर्द हे त्यांचं गाव आहे.

त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. यानिमित त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला एक प्रकाशझोत.

यशवंतराव पाटील हे आपल्या शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द या गावचे ते रहिवाशी आहेत. मुंबईत ते मुंबई महानगरपालिका इथं इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. परंतु स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मनस्वी भक्त आहेत. तर पहिल्यापासून शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

शाहुवाडी तालुक्यातील अनाथ आश्रम , मोलमजुरी करणाऱ्या महिला , गोरगरीब तरुण यांना यथाशक्ती काहीतरी देण्याचा त्यांचा नेहमीच अट्टाहास असतो. कोरोना काळात सुद्धा त्यांनी यथाशक्ती लोकांना मदत केली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मलकापूर शहर येथील धुणीभांडी करणाऱ्या महिलांना यथाशक्ती दिवाळीचा फराळ भेट म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर शहर येथील शिवसैनिकांनी दिला आहे.

एकंदरीत काय ” देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे,देता,देता, एकदिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. ” याचा शब्दश: अर्थ न घेता,त्यांची देण्याची जी प्रवृत्ती आहे,त्याचा लोकांनी अंगीकार करावा,जेणेकरून समाजात कोणीही उपाशी राहणार नाही.

पुनश्च स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या या कट्टर शिवसैनिकाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.