” साहेब ” ‘ टूर्स अँड ट्रॅव्हल्स ‘ चे उद्घाटन बांबवडे इथं संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, हा जो समज, व्यापार पेठेत रुजत आहे. त्याला फाटा देण्याचे काम बांबवडे तालुका शाहुवाडी येथील विजय लाटकर या तरुणाने केले आहे. त्यांनी बांबवडे इथं पिशवी रोड च्या सुरुवातीलाच ” साहेब ” ‘ टूर्स अँड ट्रॅव्हल्स ‘ हा नवा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दत्ता पोवार, महिला आघाडी प्रमुख सुवर्णा दाभोळकर, अलका भालेकर यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यात ‘ टूर्स अँड ट्रॅव्हल्स ‘ चा व्यवसाय कुठेही नाही. त्यामुळे विजय लाटकर यांनी दूर दृष्टी ठेवून, या व्यवसाय निवडला आहे. इथं कोणतेही चारचाकी वाहन किलोमीटर दराने उपलब्ध होणार आहे. तसेच शाळेच्या, क्लास च्या सहलींसाठी सुद्धा वाहने उपलब्ध होतील. अशी माहिती विजय लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


विजय लाटकर हे स्वत: उत्तम ड्रायव्हर आहेत. तसेच त्यांना या क्षेत्राचा सुमारे दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आहे. अनुभवाचा त्यांना या व्यवसायात चांगलाच लाभ होणार आहे. त्यांच्या या नवीन व्यवसायास साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने खूप खूप शुभेच्छा.