” सिताई ” समूहाच्यावतीने कोविड सेंटर मध्ये अंडी वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील करंजोशी येथील अल्फोन्सा कोविड सेंटर मध्ये सिताई घायपात उद्योग समूहाच्या वतीने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा पायंडा जपला आहे. समूहाचे चेअरमन श्री आनंदराव कामत यांनी त्यांचे चिरंजीव रणवीर कामत यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटर मध्ये अंडी वाटप करून सामाजिक बांधिलकी मध्ये खारीचा वाटा उचलला आहे.

आपण स्वत:साठी नेहमीच जगतो. परंतु कधीतरी दुसऱ्यासाठी जगून पहा,आनंदाचा परमोच्च बिंदू गाठल्याचं समाधान मिळतं. असे भावनिक उद्गार श्री आनंदराव कामत यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना काढले.

ते पुढे म्हणाले कि, अशाच काही आठवणी निमित्त प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. इथं प्रश्न आर्थिकतेचा नसून भावनेचा असतो. आपल्यापरीने जेवढे जमते, ते ते समाजासाठी करावे, तरच आपण समाज ऋणातून मुक्त होवू, असेही श्री कामत यावेळी म्हणाले.

अल्फोन्सा कोविड सेंटर मध्ये कोविड चे रुग्ण आहेत. त्यांची शारीरिक ताकद वाढावी, त्याचबरोबर समाज आपल्यासोबत आहे, असे वाटावे. कारण त्या माध्यमातून शारीरिक सुदृढतेसोबत मानसिक आधारही रुग्णांना मिळतो. ” सिताई ” चे काम कौतुकास्पद आहे. याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांचे चिरंजीव रणवीर कामत यांनासुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या वाटप प्रसंगी त्यांच्यासोबत सरोदे सर, अमोल घाटगे, विलास शिंदे, अरविंद कांबळे, विशाल कांबळे, संपत घोलप, प्रशांत सकटे, व कोविड सेंटर चे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.