congratulationsसामाजिक

सीताराम बोटांगळे यांचा पारधपद सांप्रदाय च्यावतीने नागरी सत्कार संपन्न

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील वारूळ येथील सीताराम (बापू ) बोटांगळे यांचा पारधपद सांप्रदाय च्यावतीने सांप्रदाय चे संस्थापक  बबन चौरे महाराज यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात सर्वत्र शाळा बंद असताना बोटांगळे यांनी नियमित अनौपचारिक शिक्षण चालू ठेवून, शालेय विद्यार्थ्यांत वाचन, लेखन, संख्या ज्ञान, भजन कीर्तन, लेझीम खेळ, व मूल्य शिक्षण या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया अखंडित ठेवली.

तसेच कडवी नदी संवर्धनात त्यांनी योगदान दिले. या कामाची दखल घेवून, कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेने यंदाचा गुरुवर्य पुरस्कार देवून, त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेवून, पारधपद संस्थेच्या वतीने सीताराम बोटांगळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी वारूळ चे माजी सरपंच शंकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागत भगवान पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक राजेंद्र लाड यांनी केले. दरम्यान आपल्या प्रास्ताविकपर भाषणात श्री लाड यांनी बापूंच्या कार्याची माहिती दिली. यावेळी चौरे महाराजांचे प्रवचन झाले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष यशवंत पाटील, सरपंच किरण परीट, उपसरपंच गोविंद सुतार, सिराज शेख, मारुती बोटांगळे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रकाश पाटील, शंकर पाटील, सीताराम पाटील, शाहीर बंडा भोसले, माजी चेअरमन महिपती पाटील, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

करुंगळे, केर्ले, निळे, नेर्ले, पारनेर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमा अगोदर बापूंनी मिरज येथील नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचा सत्तर रुग्णांनी लाभ घेतला, तर १५ जणांवर  मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!