सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी ” नेक्स्ट लेवल जीम ” : एकदा भेट देवून खात्री करा- मानसिंग पाटील
बांबवडे : आपण मधुमेह, उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अशा व्याधींनी त्रस्त आहात का ? याचे उत्तर जर होय असेल तर, यासाठी शारीरिक व्यायामा द्वारे आपल्या या व्याधी खात्रीशीर रित्या कमी होतील, किंबहुना नाहीशा होतील, असे मत नेक्स्ट लेवल जीम चे मालक श्री मानसिंग मधुकर पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


श्री मानसिंग पाटील हे पिशवी तालुका शाहुवाडी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी डोणोली येथील राजे लॉजिंग येथील पहिल्या माळ्यावर उच्च तांत्रिक व्यायामाची साधने आणून ,अनेक नागरिकांच्या व्याधी कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर फॅट लॉस, वेट लॉस ,यासोबत ज्यांचे वजन खूपच कमी आहेत, त्यांचे वजन वाढवून देण्याचे तंत्र सुद्धा व्यायामाच्या माध्यमातून सिद्ध केले जाईल असेही सांगितले.


ते पुढे म्हणाले कि, गेल्या दशकात तरुणांचे व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. एक काळ असा होता कि, ग्रामीण भागातील तालीम शड्डूंच्या आवाजाने घुमत असंत. परंतु सद्यस्थितीत तालीम इतिहास जमा होवू लागल्या आहेत. परंतु अजूनहि शाहुवाडी तालुक्यात तितकीशी उदासीनता नाही. फक्त तालीमची जागा आत्ता आधुनिक व्यायामशाळेने घेतली आहे. याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळू लागला आहे. हे काम पिशवी तालुका शाहुवाडी येथील एक तरुण नेक्स्ट लेवल जीम च्या माध्यमातून मानसिंग मधुकर पाटील करीत आहेत. केवळ व्यायाम नव्हे तर याचसोबत योग्य आहार,तो हि आपल्या ग्रामीण भागात जो सहज उपलब्ध होतो ,त्या आहाराच्या माध्यमातून शरीरातील फॅट लॉस करता येते. फक्त यासाठी दररोज एक ते दीड तसं तुम्हाला व्यायामासाठी द्यावा लागेल. यासाठी त्यांनी सांगितले कि,” If you do not find time to exercie, You will have to find to be sick.” याचाच अर्थ तुम्ही जर व्यायामासाठी वेळ काढला नाही, तर तुम्हाला आजारपणासाठी वेळ काढावा लागेल.


नेक्स्ट लेवल जीम मध्ये केवळ तरुण वर्ग व्यायामासाठी येतात, एवढेच नव्हे ,तर फॅट लॉस साठी तसेच वेट लॉस साठी सुद्धा तरुण वर्ग इथं येत आहेत. आणि फॅट लॉस करण्यात ते यशस्वी झाले आहेत. असे जीम चे मालक मानसिंग पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. फॅट लॉस तसेच वेट लॉस यामध्ये काय फरक आहे, याचे त्यांनी विश्लेषण केले. यामध्ये वेट लॉस पेक्षा फॅट लॉस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. दरम्यान इथं आहारतज्ञ श्री उमेश पाटील यांच्या माध्यमातून आपला आहार कसा असावा, याचे मार्गदर्शन केले जाते. आपण औषधांवर जो खर्च करतो , तो खर्च अत्यल्प होवून आपले शरीर सुदृढ बनते. असेही श्री पाटील यावेळी म्हणाले.

जर आपल्याला फॅट लॉस करायचे असेल, तर, त्या अनुषंगाने आपला आहार काय असावा, याची तंत्रशुद्ध माहिती इथं दिली जाते. आणि त्याच अनुषंगाने आपल्याकडून व्यायाम, करून घेतला जातो. तसेच आपल्याकडे वयैक्तिक लक्ष देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. यासाठी फक्त आपल्याला व्यायामासाठी वेळ देणे गरजेचे आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात व्यायाम हे आहाराइतकेच महत्व आहे. जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल, आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्याची इच्छा असेल, तर आपल्यासाठी नेक्स्ट लेवल जीम हे योग्य ठिकाण आहे. इथं माफक दरात आधुनिक व्यायामाच्या साहित्याद्वारे योग्य आहाराच्या टिप्स दिल्या जातात. आणि केवळ दोन महिन्यात आपल्याला ,हवा तसा निकाल पाहायला मिळेल, असेही श्री मानसिंग पाटील यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी आपण मो. क्र. ९५०३०१०७०७ या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क वेळ सकाळी ६ .०० ते १०.०० संध्याकाळी ४.०० ते ८.३० यावेळेत जीम खुली असते. असेही श्री मानसिंग पाटील यांनी सांगितले.

जे इच्छुक आमच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत,त्यांनी next level fitness donoli या यु ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा, आणि माहिती घ्या,व निरोगी जिवन जगा, असे आवाहन देखील मानसिंग पाटील यांनी केले आहे.