सुपात्रे च्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ” एक दिवस विज्ञान केंद्रामध्ये ” हा उपक्रम संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : आजच्या एकविसाव्या शतकात आणि स्पर्धेच्या युगात माहिती तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे असून, त्याची खऱ्या अर्थाने ओळख होण्यासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित वारणा विज्ञान केंद्र या वारणा समूहाने आयोजित केलेल्या ” एक दिवस विज्ञान केंद्रामध्ये ” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे मत प्रतिपादन गोकुळ चे संचालक व सुपात्रे न्यू इंग्लिश स्कूल चे चेअरमन कर्णसिंह गायकवाड यांनी केले.

सुपात्रे तालुका शाहुवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वारणेचा हा उपक्रम पहिल्यांदा सादर केला. या शुभारंभ प्रसंगी श्री कर्णसिंह गायकवाड बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती महादेवराव पाटील साळशीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक संजय वास्कर यांनी स्वागत केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारणा विज्ञान केंद्राचे प्राचार्य जॉन डिसुझा यांनी केले.

यावेळी कर्णसिंह गायकवाड पुढे म्हणाले कि, या उत्कृष्ट उपक्रमाची सुरुवात सुपात्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल पासून होत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सादर करण्यात आला आहे. बेंगलोर , मुंबई नंतर वारणेत आलेल्या जागतिक दर्जाच्या तारांगणा मध्ये ब्रम्हांड, आकाशगंगा, तारे, तारका समूह, राशी नक्षत्र याची शास्त्रीय माहिती चित्रफितीतून विद्यार्थ्यांना विनामुल्य मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा निर्माण होणार आहे.


यावेळी विष्णू पाटील, नामदेव पाटील, विलास खुटाळे, आनंद तोरस्कर, उद्योगपती बाबुराव पाटील, पांडुरंग सावरे, संदीप हांडे, मधुकर हांडे, शिवाजी पाटील, व्ही.एस. पाटील, डी.एस. पाटील, एच.एन.शेवाळे, एस.एन.बोरगे, विशाल यादव, लक्ष्मण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.टी. पाटील यांनी केले.