सुरज बंडगर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या शाहुवाडी तालुकाध्यक्ष पदी निवड
बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील सुरज मारुती बंडगर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या शाहुवाडी तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने देखील त्यांचे अभिनंदन आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने हि निवड करण्यात आली असून, कोल्हापूर चे नेते ए.वाय. पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कल्पेश चौगुले यांच्या स्वाक्षरी चे पत्र त्यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या आहेत.
सुरज बंडगर हे मानसिंग दादा गायकवाड घराण्याशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ता असून, रणवीरसिंग गायकवाड यांच्यासोबत समाजकार्यात ते अग्रेसर आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल पुनश्च त्यांचे अभिनंदन.