सुरेश बापूंना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ज्येष्ठ सदस्य श्री सुरेश शंकर नारकर आणि सर्वांचे बापू यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवार तसेच त्यांचे चाहते पांडुरंग निकम आणि बापूंचा पांडा यांच्यावतीने बापूंना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
सुरेश बापू म्हणजे सर्व सामन्यांचा आधारवड. बापू कोणत्याही लोकप्रतिनिधींचे समर्थक असोत, पण आपल्या गावासाठी माणसांसाठी कधीही धावून येणारं हे व्यक्तिमत्व जनमानसात आदराच्या स्थानावर नेहमीच आरूढ झालेलं असतं. म्हणूनच गेली २५ वर्षे सलग निवडून येण्याचा त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत हातकंडा आहे.
गावाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी नेहमीच सदैव तयार असणारं हे व्यक्तिमत्व स्वाभिमानी आणि सर्वांना हवहवंसं वाटणारं आहे. म्हणूनच सर्व ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा बापूंना लाख लाख शुभेच्छा. समाजासाठी झटणारी माणसं सध्या कमी झाली आहेत. केवळ पैसा, कंत्राट आणि प्रसिद्धी यासाठी अनेकजण मिरवत असतात. परंतु सुरेश बापू नेहमीच प्रसिद्धी पासून चार हात लांब असतात. परंतु सोनं हे सोनंच असतं, ते कुठेही ठेवलं तरी चकाकतंच.
अशा या निगर्वी व्यक्तिमत्वाला त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना खूप यश लाभो. आणि पुनश्च त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंद पवार आणि परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.