सोनवडे च्या पंचशील तरुण मंडळ यांच्यावतीने दि.१३ व१४ मे जयंती सोहळा
बांबवडे : पंचशील तरुण मंडळ सोनवडे तालुका शाहुवाडी यांच्या वतीने दि.१३ व १४ मे २०२३ रोजी तथागत गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती असा संयुक्त सोहळा सोनवडे इथं संपन्न होणार आहे. अशी माहिती मंडळाचे उत्तम वाघमारे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

दि.१३ मे रोजी सकाळी ९.०० वा. फोटो पूजन, व दीपप्रज्वलन, सकाळी १०.०० वा. धम्म ध्वजारोहण, ध्वजवंदना, ११.०० वा. वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. तसेच सायंकाळी ६.०० वा. महामानवांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

दि.१४ मे रोजी सकाळी ९.०० वा. धम्मवंदना, दीपप्रज्वलन, सकाळी ९.३० ते दु.२.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. सायंकाळी ६.०० जाहीर सभा, रात्री ९.०० वाघमारे प्रस्तुत ” गाथा भीमाची ” गायन .असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यावेळी सभा अध्यक्ष रंगराव वाघमारे असतील. तर प्रमुख वक्ते म्हणून कीर्ती कॉलेज चे प्रा.डॉ. बापूसाहेब कांबळे, प्रा. प्रकाश नाईक शिवशाहू महाविद्यालय सरूड यांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, सागर शंभू शेट्ये यांची उपस्थिती असणार आहे. तसेच तहसीलदार रामलिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक शाहुवाडी प्रकाश गायकवाड, प्रा. डॉ. आनंदराव वाघमारे, डॉ. रवींद्र वाघमारे, विजय वाघमारे, सोनवडे विद्यामंदिर मुख्याध्यापक, कृष्णा पाटील, ग्रामपंचायत सोनवडे सरपंच,उपसरपंच व सदस्य मंडळ, पैलवान वसंत पाटील, मा. सभापती विष्णू पाटील, ग्रामसेवक दीपक पाटील, श्रीकांत शेलार, रमेश डोंगरे, अनिल गुरव, बेनझीर मॅडम, प्रीतम वाघमारे, जनार्दन वाघमारे, आनंदराव वाघमारे आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पंचशील मंडळाचे उपाध्यक्ष अमर वाघमारे, सचिव श्रीकांत वाघमारे, सहसचिव प्रकाश वाघमारे, उत्तम वाघमारे, दीपक वाघमारे, दशरथ वाघमारे आदी मंडळी कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.