सोनवडे च्या सोनाली वाघमारे कॉम्प्यूटर ऑपरेटर प्रशिक्षणात महाराष्ट्रात ६२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण: पंचक्रोशीतून अभिनंदन
बांबवडे प्रतिनिधी : सोनवडे तालुका शाहुवाडी येथील रंगराव वाघमारे यांची कन्या सोनाली रंगराव वाघमारे यांनी कॉम्प्यूटर ऑपरेटर या ट्रेड मध्ये ८६ % गुण मिळवून उत्तीर्ण झाली असून, राज्यात त्यांचा ६२ वा क्रमांक लागला आहे. त्यांच्या या यशामुळे पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने सोनाली वाघमारे यांचे हार्दिक अभिनंदन.

सोनाली वाघमारे यांनी कोविड काळात, सगळं जग ठप्प झाल्यानंतर या कन्येने शाहुवाडी येथील औद्योगिक शिक्षण संस्थेतून कॉम्प्यूटर ऑपरेटर या ट्रेड साठी प्रवेश घेतला. आणि त्यांनी आपल्या अभ्यासातून आपली गुणवत्ता सिद्ध केली, आणि महाराष्ट्रातून ६२ वा क्रमांक पटकवला. शाहुवाडी तालुका हि रत्नांची खाण आहे. इथं कर्तबगारीला कोणी कमी पडत नाही. जसा इथला तरुण निधड्या छातीचा असून, कर्तबगारीत अग्रेसर असतो, तसेच इथल्या मुली सुद्धा तितक्याच क्षमतेच्या आहेत, हे सोनाली वाघमारे यांनी आपल्या कर्तबगारीतून दाखवून दिले आहे.

रंगराव वाघमारे हे सोनाली यांचे वडील असून, ते सोनवडे येथील पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. पुनश्च सोनाली वाघमारे यांचे हार्दिक अभिनंदन.