सौ सुवर्णा दाभोळकर यांची भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सौ. सुवर्णा दाभोळकर यांची भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशा आशयाचे नियुक्तीपत्र श्री उदयसिंग खोत कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने त्यांना देण्यात आले आहे.

यावेळी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सागर पवार, सचिव सुरेश पाटील उपस्थित होते. हे नियुक्ती पत्र कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह इथं अनेक पदाधिकाऱ्यांना निवडी ची पत्रे देण्यात आली. यावेळी सौ दाभोळकर यांचीदेखील यावेळी नियुक्ती करण्यात आली.
सौ.सुवर्णा दाभोळकर या शिवसेनेच्या शाहुवाडी तालुका महिला उपाध्यक्ष म्हणून त्या काम पहात आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांचे सौ. मंजिरी पवार, सौ. लक्ष्मी गावडे, सौ.शर्मिला जौंजाळ, सौ भाग्यश्री बाऊचकर, सौ. सुजाता दाभोळकर, सौ दिपाली साडविलकर आदी महिलांनी त्यांचे अभिनंदन केले. याचबरोबर शाहुवाडी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.