स्वत:च्या थंब द्वारे धान्य वितरणाची शासनाकडून परवानगी : ठमके
बांबवडे : रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची मागणी शासनाकडून मान्य करण्यात आली असून, ग्राहकांच्या थंब ऐवजी दुकानदाराचा थंब वापरून ग्राहकांना धान्य वितरीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष गामाजी ठमके यांनी दिली.
यावेळी बोलताना गामाजी ठमके पुढे म्हणाले कि, गेल्याच आठवड्यात धान्य दुकानदार संघटनेकडून निवेदनाद्वारे वस्तुस्थिती सांगून धान्य वितरण करण्यात येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच पॉस मशीन द्वारे ग्राहकांना कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने शासनाने रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेला,दुकानदाराचा स्वत:चा थंब वापरून ३१ मे पर्यंत धान्य वितरीत करण्याची परवानगी दिली आहे.