स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मलकापुरात भव्य पदयात्रा – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाहुवाडी
मलकापूर विशेष (श्रीमंत लष्कर ) :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाहुवाडी यांच्यावतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन मलकापूर शहरात आयोजित करण्यात आले होते. या पदयात्रेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी अभाविप चे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्री अभिजित पाटील म्हणाले कि, या पदयात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात जे क्रांतिकारक सहभागी झाले होते, त्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहावी. स्व;चेतना जागवून, समाज व राष्ट्र निर्मितीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील श्रीअभिजित पाटील यांनी केले.
शहरातील ग. रा. वारंगे महाविद्यालय आणि मलकापूर हायस्कूल च्या शेकडो विद्यार्थ्यांनी या पदयात्रेत सहभाग घेतला होता.

यावेळी अभाविप कोल्हापूर विभाग संयोजक आदित्य खंडागळे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हा संयोजक गौरव ससे, तसेच प्रसाद लष्कर, सिद्धार्थ लोखंडे, धनश्री पाटील, प्रथमेश सुतार, मृण्मय बेंडके, दिनेश हुमनाबादे, रुपराज घावाळे, राहुल बुडके,हे कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर शहरातील नागरिकांनी सुद्धा या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.