स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाहुवाडी पोलिसांनी केले ” शाहुवाडी दौड ” चे आयोजन
बांबवडे : शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने मलकापूर ते शाहुवाडी अशी ” शाहुवाडी दौड ” संपन्न झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या दौड चे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

शाहुवाडी दौड मध्ये शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेवून मलकापूर ते शाहुवाडी हे अंतर पार केले. या शाहुवाडी दौड मुळे शाहुवाडी पोलिसांचा एक आगळा उपक्रम तालुकावासीयांना पहायला मिळाला.

स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त हि दौड करण्यात आली. शाहुवाडी पोलीस सध्या कर्तृत्वात एक एक पायरी सर करीत निघाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी मानोली इथं सापडलेलं अनोळखी प्रेत , या केस चा छडा लावण्यात शाहुवाडी पोलिसांना यश आले आहे.

एक तरुण टीम पोलीस निरीक्षक यांच्यासोबत असल्याने कदाचित हा परिणाम असावा. म्हणूनच या दौड चे आयोजन कदाचित या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने श्री विजय पाटील यांनी केले आहे. त्यांना सहकार्य पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे यांनी केले .