‘ स्वामी कलेक्शन ‘ चे चिकुर्डे इथं ” शिव-पार्वती वस्त्रनिकेतन ” : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
बांबवडे : बांबवडे ता. शाहुवाडी येथील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या ” स्वामी कलेक्शन ” चे मालक चौगुले बंधू यांचे ” शिव-पार्वती वस्त्रनिकेतन ” आजपासून चिकुर्डे तालुका वाळवा जि. सांगली इथं कपड्यांचे भव्य दालन उभे रहात आहे.

या शिव-पार्वती वस्त्रनिकेतन चे उद्घाटन जलसंपदा मंत्री नाम. जयंत पाटील, डॉ. शिमोनी नाईक, श्री विराज नाईक, सौ.सुजाता अनिल चिवटे,श्री अनिल विश्वनाथ चिवटे (आबा ) यांच्या शुभ हस्ते होत आहे.

या उद्घाटन सोहळ्यास शाहुवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. विनय कोरे, वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ शुभलक्ष्मी कोरे, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन श्री पी. आर. पाटील, शिराळा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री मानसिंग नाईक (भाऊ ), आपला बझार शिराळा च्या अध्यक्षा सौ. सुनितादेवी नाईक , वारणा साखर चे संचालक श्री श्रीनिवास डोईजड , वारणा दुध संघाचे संचालक श्री अभिजित पाटील, राजाराम दुध संघाचे संचालक श्रीमंत सोमराज देशमुख (बाबा ) , गणेश उद्योग समूह चिकुर्डे चे संस्थापक श्री राऊसाहेब भोसले (नाना ), गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बांबवडे येथील स्वामी कलेक्शन च्या भव्य यशानंतर चौगुले बंधूंचे हे शिव-पार्वती वस्त्रनिकेतन चे भव्य कपड्यांचे दालन त्यांचे कष्ट आणि सचोटी चा व्यवहार याची साक्ष देत आहेत.

या शुभारंभाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन श्री अमर चौगुले व श्री अमित चौगुले , या चौगुले बंधूंनी केले आहे.