स्व.आम.संजयदादा यांना विनम्र आदरांजली : शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज
बांबवडे : स्व.आम. संजयसिंह गायकवाड यांची आज रामनवमी यादिवशी पुण्यतिथी आहे.या निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
प्रतिवर्षी या अजातशत्रू नेतृत्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे असंख्य चाहते त्यांच्या सुपात्रे तालुका शाहुवाडी या गावी त्यांच्या समाधीस्थळावर एकत्र येतात. सध्या देशात आणि राज्यात उद्भवलेल्या परिस्थिती नुरूप या वेळचा कार्यक्रम रद्द केला आहे. परंतु जरी समाधीस्थळावर जाता आले नाही,तरी त्यांची आठवण मात्र प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि चाहत्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.
एकेकाळी ओसाड असलेल्या या तालुक्याला संजीवनी देण्याचे भगीरथ प्रयत्न या अवलियाने केले म्हणूनच आज अनेकांच्या शिवारात नगदी पिकं दिसत आहेत.दूरदृष्टी असलेल्या या नेतृत्वाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज च्या वतीने विनम्र आदरांजली.