स्व.नामदेव जाधव (महाराज ) यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील प्रतिष्ठित बुजुर्ग व्यक्तिमत्व नामदेव मामा जाधव ( महाराज ) यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन संपन्न झाला. यावेळी त्यांना ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहिली. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

यावेळी दिनकरराव जाधव यांच्यासहित कुटुंबियांनी विधिवत पूजा करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी जुन्या आठवणींना ग्रामस्थांकडून उजाळा दिला गेला. दिवंगत नामदेव महाराज हे प्रगतशील शेतकरी सुद्धा होते. शेतामध्ये विविध पिकांची बियाणे लावून प्रयोग करणे, हा त्यांचा ध्यास होता.

शेती हि आपली मायमाउली आहे. अशी त्यांची श्रद्धा होती. यावेळी त्यांचे सुपुत्र दिनकरराव जाधव यांनी देखील आपला वारसा पुढे चालविण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु ठेवला आहे.