स्व.प्रदीप पाटील (बाबा ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम – प्राचार्य जद सर यशवंत अकॅडमी डोणोली
बांबवडे :श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ चे माजी व्यवस्थापक स्व. प्रदीप यशवंत पाटील ( बाबा ) यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. प्रदीप पाटील (बाबा ) यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटल, कोडोली येथे विविध रोगांचे मोफत निदान व माफक उपचार शिबीर देखील सुरु आहे. या संधीचा पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल च्या वतीने करण्यात येत आहे.

स्व. प्रदीप पाटील ( बाबा ) यांच्या स्मृती दिनानिमित्त यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली येथे सुद्धा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.१३ जुलै २०२२ रोजी बुधवार सकाळी ९.०० वाजलेपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी १०.०० वा. आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच सद्भावना दौड आयोजित करण्यात आली आहे.
श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील सर यांनी, आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.