स्व.यशवंत दादांना त्यांच्या ९४ व्या जयंती निमित यशवंत शिक्षण मंडळाची भावपूर्ण आदरांजली
बांबवडे : आज दि.४ मार्च २०२४ रोजी स्व.यशवंत एकनाथ पाटील यांची ९४ वी जयंती संपन्न होत आहे. या अनुषंगाने या महान व्यक्तिमत्वाला श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ चे सर्व अध्यक्षा , तसेच सर्व पदाधिकारी यांच्यावतीने विनम्र अभिवादन केले आहे. असे यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने देखील स्व. यशवंत एकनाथ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
सह्याद्रीच्या कड्या -कपारीतील प्रत्येक माणूस शिकून सुशिक्षित झाला पाहिजे. आणि डोंगर कपारीत असलेलं भवितव्य देशामध्ये नामांकित झालं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक शिक्षण यज्ञ तत्कालीन आमदार स्व. यशवंत एकनाथ पाटील दादा यांनी आरंभिला. या शिक्षण यज्ञाचे करता करविता म्हणजे पन्हाळा तालुक्यातील एक रांगडं व्यक्तिमत्व .ते म्हणजे श्री यशवंत एकनाथ पाटील हे होय. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती पद्मजा प्रदीप पाटील, सचिव डॉ. जयंत पाटील या मंडळींनी त्या रांगड्या व्यक्तिमत्वाच्या इच्छेचा मन ठेवून पन्हाळा तालुक्यात आयुर्वेदीक कॉलेज, यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड प्रदीप पाटील ज्युनिअर कॉलेज डोणोली तालुका शाहुवाडी या शाळांची निर्मिती करून सह्याद्रीच्या उदरात शिक्षणाची भगीरथ गंगा निर्माण केली आहे. पुनश्च अशा महान व्यक्तिमत्वाला विनम्र आदरांजली यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाने वाहिली आहे.
तसेच प्राचार्य श्री सचिन जद सर, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने देखील विनम्र अभिवादन करत आदरांजली वाहिली आहे.