स्व. शंकर पाटील शिंपेकर यांचे १७ वे पुण्यस्मरण :भावपूर्ण श्रद्धांजली
स्व. शंकर विठू पाटील लाड आबांनी आयुष्यभर संघर्ष केला. हे करत आपल्या अंगी असलेला दिलदारपणा त्यांनी कधी सोडला नाही. त्यांनी पाहिलेली स्वप्ने त्यांची नातवंडे निश्चितच पूर्ण करतील. आज त्यांचे १७ वे पुण्यस्मरण आहे. त्यांच्या या पुण्यतिथी निमित्त त्यांना माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. असे मत त्यांचे नातू संपत पाटील शिंपेकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
शिंपे तालुका शाहूवाडी येथील शंकर विठू पाटील लाड आबा यांनी त्यांच्या काळात खूप संघर्ष केला. त्यांनी केलेल्या संघर्षामधूनच आज यशाचे पीक डोलत आहे. त्यांचा दिलदारपणा व त्यांनी कुटुंबासाठी घेतलेले कष्ट आम्ही आजही विसरू शकत नाही. असेही श्री संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले कि, आबांचे प्रेम आणि त्यांच्या आठवणी आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या आठवणी आम्ही ते जिथे राहायचे त्या ठिकाणी फार्म हाऊस च्या माध्यमातून जपले आहे. आबांचे कष्ट कोणीतरी हिरावून घेतले,तरी त्यांची स्वप्ने कोणी हिरावून घेऊ शकत नाहीत.ती स्वप्ने आम्ही निश्चित पूर्ण करू,असे आश्वासन श्री संपत पाटील यांनी आजच्या १७ व्य पुण्यस्मरण दिनी दिले आहे.