स्व. संजयदादा दीनदुबळ्यांचे कैवारी – सुनील पाटील थेरगावकर
बांबवडे : आज रामनवमी. स्व.संजयसिंह गायकवाड आणि सामान्य कार्यकर्त्यांचे ” दादा “, यांची आज पुण्यतिथी . यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. आणि भावपूर्ण आदरांजली.असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनील शंकर पाटील थेरगावकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले , कि , स्व. संजयदादा हे व्यक्तिमत्व आम्ही अगदी लहानपणापासून पहात आलो आहोत. कारण आमचे वडील स्व. शंकर पाटील हे दादांचे खंदे समर्थक होते. त्यामुळे दादांचे आमच्या घराशी घनिष्ठ संबंध होते. आणि आहेत. त्यांच्या पश्चात गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड (बाळ) सरकार, तसेच योगीराज सरकार हे आपल्या वडिलांचे ऋणानुबंध पुढे सुरु ठेवत आहेत.

परंतु आम्ही लहानपणी पाहिलेले दादा ,आठवले कि , आपण एका मोठ्या नेत्याला कसे मुकलो, याची आठवण होते. कारण दादा म्हणजे एक अभूतपूर्व नेतृत्व मानावयास हरकत नाही. कोणत्या गावाला, कोणते विकासकाम हवे आहे, हे, ते कसे काय जाणून घेत होते. ते कळत नव्हते. परंतु तालुक्यात असे गाव नाही,ज्या गावात संजयदादा यांचे विकासकाम नाही. अशा दूरदृष्टी असलेल्या नेत्याला तालुका खूपच अगोदर मुकला आहे.
दादा म्हणजे खऱ्या अर्थाने दिन दुबळ्या जनतेचे कैवारी होते, कारण दादांकडे कुणीही कार्यकर्ता गेला, तो रिकाम्या हाताने कधी परतला नाही. काम विकासाचे असो कि, वयैक्तिक, दादा ते नक्की पूर्ण करीत असंत.
अशा या निगर्वी व्यक्तिमत्वाला सुनील पाटील थेरगावकर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन.