स.८.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. मलकापूर परळ एसटी बस सुरु : जनतेकडून एसटी खात्याचे अभिनंदन
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर एसटी आगाराच्या वतीने मलकापूर – परळ नवी एसटी बस सुरु करण्यात आली असून, यामुळे शाहुवाडी तालुक्यातील जनतेला एकप्रकारचा दिलासा मिळाला आहे.

सध्या शाहुवाडी तालुक्यात मुंबई प्रवास खूपच वाढला आहे. त्यामुळे खाजगी बस वाहतूक करणारे नागरिकांकडून त्यांच्या मनाला वाटेल तो दर लावून नागरिकांना प्रवास करण्यास भाग पाडतात. आणि गरज असल्यामुळे जनता मागेल ती किमत देवून, प्रवास करते.

हि मलकापूर- परळ बस, मलकापूर, बांबवडे, भेडसगाव, कोकरूड, शेडगेवाडी, कराड, सातारा मेगा हायवे, पनवेल, वाशी, मैत्रीपर्क, सायन, दादर मार्गे परळ असा प्रवास करणार आहे.

परंतु एसटी महामंडळाच्या मलकापूर आगाराकडून सकाळी ८.०० वा. व संध्याकाळी ६.०० वा.मलकापूर – परळ हि एसटी बस धावण्यास सुरु झाली आहे. तसेच परळ हून मलकापूर साठी सुध्दा सकाळी ८.०० व सायंकाळी ६.०० वा.पुन्हा परत येणार आहे.

हि बस सुविधा निश्चित शाहुवाडीकरांना आनंदाचा धक्का देणारी आहे. कारण भांडवलदारांनी इथल्या ग्रामीण जनतेला लुटण्याचा सोनेरी मार्ग काढला होता. परंतु या बस मुळे जनतेला निश्चित सुखकर प्रवास करण्याचा अनुभव मिळणार आहे. यामुळे एसटी खात्याला सुद्धा चांगले उत्पन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही. या एसटी खात्याने सुरु केलेली एसटी बस सुविधा निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रवासी ग्राहकांनी सुद्धा या एसटी बस ने प्रवास करण्यास प्राधान्य द्यावे. अन्यथा उत्पन्न कमी झाल्याच्या कारणामुळे बस बंद होण्याची नामुष्की पत्करू नये. त्यामुळे एसटी प्रवासाला प्राधान्य देण्यात यावे. असे आवाहन देखील एसटी आगाराकडून करण्यात येत आहे.