” हर घर तिरंगा ” अभियान तळागाळापर्यंत राबवा- आमदार डॉ. विनय कोरे
कोडोली प्रतिनिधी : मतदारसंघातील सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन शाहुवाडी – पन्हाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले आहे.

” हर घर तिरंगा ” अभ्यानास बळकटी यावी, म्हणून दलितमित्र अशोकराव माने ( बापू ) यांनी दहा हजार तिरंगा झेंडे डॉ. विनयरावजी कोरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. त्यांनी ते झेंडे आपल्या दुर्गम भागातील वाड्या- वस्त्यांवर असलेल्या गोर- गरीब जनतेला आपल्या घरावर लावण्यासाठी द्यावेत, या अपेक्षेने हे झेंडे आमदार डॉ. विनय कोरे यांना दिले आहेत.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.या गौरवशाली पर्वानिमित्त देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा, अशी संकल्पना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. या अनुषंगाने ” हर घर तिरंगा ” हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहतील.

जिल्हा परिषद सदस्य श्री अशोकराव माने (बापू ) यांनी मतदारसंघात वाटण्यासाठी दहा हजार तिरंगा झेंडे यांनी दिल्याबद्दल जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमदार डॉ. विनय कोरे यांनी श्री माने यांचे आभार मानले. यावेळी वडगाव चे नगराध्यक्ष श्री मोहनलाल माळी यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.