हायवे साठी जमिनी अधिगृहनाला विरोध- डोणोली शेतकऱ्याची न्यायालयात धाव ?
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात निर्माण होणाऱ्या हाय-वे च्या अनुषंगाने जमिनी, शेती शासनाकडून अधिगृहित करण्यात येत आहे. परंतु या महामार्गावर येणाऱ्या डोणोली, खुटाळवाडी इथं शेती असणारे बरेचसें शेतकरी या भूमी अधिगृहन करण्याच्या विरोधात असल्याचे समजते. दरम्यान डोणोली येथील शेतकरी श्री रंगराव पाटील यांनी या अधिगृहनाला कडाडून विरोध केला असून, त्याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचेही श्री रंगराव पाटील यांच्याशी बोलल्यानंतर समजले.


दरम्यान शाहुवाडी तालुक्यात महामार्गासाठी शेती,जमीन अधिगृहित करण्यात येत आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पैसे सुद्धा मिळाले आहेत. परंतु हा रस्ता गावाच्या गायरानातून नेला, तर रस्त्याची लांबी कमी होणार असून, त्यातून शासनाचे पैसे सुद्धा वाचणार आहेत. परंतु अधिकारी जाणूनबुजून हा रस्ता शेती, विहिरी यांच्यामधून नेवू पहात आहेत. याचे परिणाम शेतकरी भूमिहीन होण्यामध्ये रुपांतरीत होणार आहे. जरी भूमिहीन झाला नाही, तरी त्यांनी विहीर, पाईपलाईन यासाठी घातलेला खर्च आणि यापुढील पिढीला शेती मिळणार नाही. अशा अनेक कारणांमध्ये होणार आहे. त्यामुळे माझ्यासहित डोणोली येथील शेतकरी या भुमिअधिग्रुहनाला कडाडून विरोध करीत आहोत, तसेच त्यासाठी उच्च न्यायालयात जात आहोत, असेही श्री रंगराव पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


दरम्यान आमचा महामार्ग होण्यास विरोध नाही, परंतु तो शासकीय जमिनीतून जाणे शक्य असतानाही, शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा अट्टाहास शासकीय अधिकारी करीत आहेत. यातून शासनाचे नुकसान भरपाई पोटी जाणारी रक्कम सुद्धा कमी होवून, शासकीय तिजोरीला देखील थोडा दिलासा मिळेल. त्यामुळे शासनाने डोणोली खुटाळवाडी येथील जमिनी शासकीय गायरानातून अधिगृहित कराव्यात, अशीही मागणी डोणोली चे शेतकरी रंगराव पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केली.