हा संप म्हणजे कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया – श्री सुभाषराव गुरव
बांबवडे : शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मंडळाच्या शिफारशी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात. तसेच व्यवस्थापनाने याबाबत चर्चेला यावे. हि चर्चा टाळून कोणाचेच भले होणार नाही. तसेच हा संप व्यवस्थापनातील जेष्ठ मंडळींनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना धमकावले. त्याचीच हि उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली आहे. असे ज्येष्ठ कामगार नेते व साखर कामगार फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी श्री सुभाषराव गुरव यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.
बांबवडे तालुका शाहुवाडी इथं असलेल्या उदय सह.साखर कारखाना लि.. बांबवडे- सोनवडे येथील रस्त्यावर झालेल्या उत्स्फूर्त सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
उदय सह. साखर कारखाना कर्मचाऱ्यांनी काल दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटेपासून संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांनी ऊसाची वाहने रस्त्याला चर मारून अडवली आहेत. या अगोदरच कारखाना च्या प्रशासनाला गेली नऊ महिने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात. या अनुषंगाने हा संप पुकारण्यात आला आहे.
यावेळी शरद साखर कामगार संघटनेचे खजिनदार उदय भंडारी, बबन भंडारी आणि संपत चव्हाण या कामगार नेत्यांनी कामगारांन धीर देत आमच्या संघटना आपल्या पाठीशी ठाम आहे. आपल्या हक्काच्या मागण्या मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल असे सांगितले.
यावेळी उदय साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी श्री दीपक निकम (तात्या ) यावेळी म्हणाले कि, आम्ही नेहमी दोन्ही प्रशासनाला चर्चेची संधी देत आलो आहोत. परंतु त्यांची ह्या मागण्यासंदर्भात कोणतीही मानसिकता नाही. तसेच बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी कारखान्याच्या डीस्टीलरी विभागात जावून तेथील कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे इष्ट नाही. कामगार अशा कोणत्याही घटनांनी घाबरणार नाही. तसेच जि जमीन आमच्या नावावर नोंद आहे. त्या जमिनीत शासनाकडे रस्ता म्हणून नोंद दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या गोष्टी चुकीच्या आहेत.
आम्ही आमच्या जमिनी एक औद्योगिक प्रकल्प तालुक्यात उभा राहत आहे. त्यास सहकार्य करण्यासाठी आमच्या जमिनी दिल्या होत्या. परंतु या दोन्ही प्रशासनाने संगनमताने कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इथून पुढे हा लढा अधिक तीव्र होईल. असा इशारा देखील त्यांनी आपल्या मनोगतातून दिला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या या मनोगताला पाठींबा दिला. यावेळी घोषणाबाजी देखील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. आजपर्यंत कारखाना अंतर्गत सुरु होता. परंतु अथणी प्रशासन तहसील कार्यालयाकडे जावून जमीन धारकांची जमीन हा अधिकृत रस्ता आहे. असे तहसील प्रशासनाला सांगून जमीन लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणून आजपासून संपूर्ण कारखाना उत्स्फुर्तपणे सर्व कामगार बंद ठेवणार आहेत. असे हि श्री दीपक निकम यांनी यावेळी सांगितले.
