हिंदू एकता आंदोलन कार्यकर्त्यांचे पीएफआय कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निवेदने
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : देशात धार्मिक अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांचे सातारा, कराड इथं दंगल भडकविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने हिंदू एकता आंदोलन च्या वतीने शाहुवाडी पोलीस ठाणे, व तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.

संपूर्ण देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पीएफआय संघटनेवर केंद्राने बंदी आणलेली आहे. तरीदेखील सातारा जिल्ह्यात त्यांचे कार्य गोपनीय रित्त्या सुरु आहे, असे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. तसेच जे रोहिंग्या बांगलादेशी मुस्लीम सातारा जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहे. या मंडळींचा दिवाळी नंतर सातारा शहर व कराड शहर इथं दंगल घडविण्याचा प्रयत्न असल्याचे समजते. या संदर्भाने त्यांच्या बैठका देखील घेण्यात येत आहे.


या सर्व घटनांमुळे या लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी हिंदू एकता आंदोलनाने निवेदन दिले आहे. यावेळी संघटने चे महेश विभूते, रुपेश वारंगे, उत्तम शिंगटे, मनसे चे सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, प्रसाद खटावकर व कार्यकर्ते उपस्थित होते.