१० ऑक्टोबर चा “रास्ता रोको” तूर्तास स्थगित -कृष्णात पाटील : कानसा-वारणा फौंडेशन
शाहुवाडी : मराठा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष सुरेशदादा पाटील, तसेच कानसा-वारणा फौंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष दिपकदादा पाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत काही प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे १० ऑक्टोबर रोजी पुकारलेला ” महाराष्ट्र बंद ” तूर्तास मागे घेण्यात आला असल्याचे , कानसा-वारणा फौंडेशन चे कृष्णात पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
यावेळी कृष्णात पाटील म्हणाले कि, महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्यामुळे १० ऑक्टोबर रोजी शाहुवाडी इथं पुकारलेला रास्ता रोको आंदोलन देखील मागे घेण्यात आले आहे., महाराष्ट्र बंद साठी दिलेल्या समर्थनाबद्दल संघटनेच्या वतीने मी आभार मानीत आहे.