११ ते २० सप्टेंबर शाहुवाडी तालुक्यात ” जनता कर्फ्यू ” : शाहुवाडी पंचायत समिती
बांबवडे : दि.११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत शाहुवाडी तालुक्यात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असल्याचा निर्णय शाहुवाडी पंचायत समिती व प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्अभात मा.आमदार सत्शीयजित पाटील (आबा ) यांचे मार्गदर्शन लाभले. अशी माहिती मा.उपसभापती दिलीप पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
शाहुवाडी पंचायत समिती च्या कार्यालयात पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव या विषयावर बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ.सुनिता पारळे उपस्थित होत्या.
यावेळी उपसभापती विजय खोत यांनी कोरोंना संक्रमणावर चिंता व्यक्त केली. शाहुवाडी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. हि साखळी तोडण्यावर चर्चा झाली. याच अनुषंगाने तालुक्यात ११ ते २० सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती शाहुवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती दिलीप पाटील यांनी दिली. या बैठकीला पंचायत समिती चे सदस्य उपस्थित होते.