१४ व १५ व वित्त आयोगाचा फलक ग्रामपंचायत बाहेर लावावेत, अन्यथा आंदोलन -विश्वगामी पत्रकार संघ
बांबवडे : १४ व १५ व वित्त आयोगाचा बोर्ड प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत च्या बाहेर येत्या १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लावण्यास शाहुवाडी पंचायत समिती ने आदेश द्यावेत, असे न झाल्यास राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचालित राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघाच्या वतीने पंचायत समिती च्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन संघाच्या वतीने संघाचे शाहुवाडी तालुका उपाध्याक्ष वैभव पाटील यांनी शाहुवाडी पंचायत समिती ला दिले आहे.

शासकीय परिपत्रकाच्या अनुषंगाने १४ व १५ व वित्त आयोगाच्या कामांचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावणे, अनिवार्य असते. परंतु सध्या अनेक ग्रामपंचायतींनी असे फलक लावले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सर्वच ग्रामपंचायतींनी हे फलक लावावेत, असे या निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.