२४ सप्टेंबर रोजी सरूड इथं एफआरपी चा जागर – स्वाभिमानी शेतकरी संघटना
बांबवडे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ” एफआरपी चा जागर ” अशा आशयाखाली सरूड तालुका शाहुवाडी इथं शनिवार दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा ग्रामपंचायत सरूड च्या पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येवर उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी संबोधित करणार आहेत.

१५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर इथं होणाऱ्या ऊस परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी, या जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे.

उसाचा गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्याला एक रकमी एफआरपी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी हा जागर करण्यात येत आहे. तेंव्हा सर्व शेतकऱ्यांनी सरूड येथील जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.