२६ नोव्हेंबर रोजी संविधान फेरीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा- भाई भारत पाटील
बांबवडे : भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समिती शाहुवाडी तालुका यांच्यावतीने संविधान सन्मान फेरी शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज हॉल मलकापूर ते शाहुवाडी पंचायत समिती कार्यालय शाहुवाडी पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. तसेच दु. १.०० वाजता पंचायत समिती च्या हॉल मध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समिती चे अध्यक्ष भाई भारत पाटील आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन भाई भारत पाटील, राजेंद्र देशमाने, प्रकाश कांबळे, नामदेव पाटील, अॅड. विकास राजपाल, शंकर चौगुले, राजू मगदूम, दस्तगीर आत्तार, सुदाम कांबळे,दिपक कांबळे, रमेश कांबळे आदी मंडळी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.