२ जि.प. गट, व ४ पं.स. गण च्या जागा मिळाव्यात – श्री कर्णसिंह गायकवाड सरकार
बांबवडे :आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये २ जिल्हापरिषद गट आणि ४ पंचायत समिती गण कर्णसिंह गायकवाड गटाला मिळाव्यात, अशी आग्रहाची मागणी विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे सावकार यांच्याकडे करण्यात आली आहे. असे मत गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी व्यक्त केले.
सुपात्रे तालुका शाहुवाडी येथील कर्णसिंह गायकवाड यांच्या निवास स्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. हा मेळावा कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बोलावण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून कर्णसिंह सरकार बोलत होते.
यावेळी कर्णसिंह सरकार पुढे म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्यातून ज्या ज्या वेळी गरज भासली, त्या त्या वेळी आम्ही सर्व ताकदीनिशी सावकार साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो, आणि त्यांच्या विजयात खारीचा वाटा का होईना, आम्ही उचलला आहे. या सगळ्यांचे भान ठेवून सावकार साहेब आपल्या मागण्या निश्चित पूर्ण करतील , अशी अपेक्षा आहे.
यावेळी श्री योगीराजसिंह गायकवाड म्हणाले कि, आम्ही मागील विधानसभेत आपल्या आदेशाचा मान ठेवून माघार घेतली. यावेळी जिल्हा परिषद उमेदवारी आम्हाला मिळावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान शाहुवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती श्री महादेवराव पाटील यांनी आमदार डॉ. विनय कोरे यांना जि.परिषद व पंचायत समिती च्या मागणी केलेल्या जागांच्या पत्राचे वाचन केले. यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी मागणी सुद्धा केल्याचे सांगितले. यावेळी जेष्ठ नेते सर्वश्री सुभाषराव इनामदार, बाळासाहेब गद्रे, पंडितराव नलावडे, आदी नेत्यांसह युवा नेते भरतराज भोसले आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. यावेळी शाहुवाडी पंचायत समिती चे माजी सदस्य अमरसिंह खोत म्हणाले कि, आम्ही नेत्यांच्या आदेशानुसार सावकार साहेबांना तसेच खासदार धैर्यशील माने यांना मदत केली. परंतु तशाच पद्धतीने त्यांनी यावेळी आमच्या नेत्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी आपल्या मनोगतातून अनेकांनी स्पष्ट केले कि, कर्णसिंह गायकवाड गट शाबूत राहावा, यासाठी उपरोक्त मागण्या सावकारांनी मान्य कराव्यात.
यावेळी विद्यानंद यादव ,भरतराज भोसले, विष्णू यादव, संदीप केमाडे, उत्तम पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
