३ मार्च ते १ एप्रिल बलिदान मास पाळावा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
शाहुवाडी प्रतिनिधी : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून मलकापूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाहुवाडी विभाग यांच्यावतीने सुभाष चौक मलकापूर येथे १ एप्रिल पर्यंत बलिदान मास साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर यांच्यावतीने देण्यात आली आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान हे त्याग आणि शौर्याची गाथा आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मलकापूर येथे बलिदान मास साजरा केला जातो. यावर्षीदेखील सुभाष चौक मलकापूर येथे तीन मार्च रोजी या बलिदान मास सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. हा बलिदान मास १ एप्रिल पर्यंत राहणार आहे.

या सोहळ्यात मलकापूर पंचक्रोशीतील नागरिक युवक सहभागी होत आहेत. तसेच अधिकाधिक युवकांनी ,नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने करण्यात आले.