३ मे पर्यंत भोंगे न उतरविल्यास मनसे स्टाईल कारवाई – युवराज काटकर (मनसे कोल्हापूर उपाध्यक्ष)
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : शाहुवाडी तालुक्यातील मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत खाली उतरवा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या आदेशानुसार कारवाई करेल, अशा आशयाचा इशारा वजा निवेदन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष श्री युवराज काटकर यांनी दिले.

यावेळी सदर च्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत आप-आपल्या क्षेत्रातील मुस्लीम प्रार्थनास्थळांवरील भोंगे ३ मे पर्यंत प्रशासनाने खाली उतरवावेत.

दरम्यान आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही. त्यांचे सण वगळता इतर दिवशी वाजणारे भोंगे कर्णकर्कश ठरत आहेत. यामुळे ध्वनिप्रदूषण होवून, त्याचा त्रास सगळ्या समाजाला भोगावा लागत आहे.

प्रशासनाने ३ मे पर्यंत कारवाई न केल्यास पक्षाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर निर्णय घेईल. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदरच्या निवेदनावर मनसे चे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री युवराज काटकर, शाहुवाडी तालुका अध्यक्ष धनाजीराव आगलावे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, कुणाल लाळे, तालुका सचिव रोहित जांभळे, विभाग अध्यक्ष प्रदीप वीर, उपविभाग अध्यक्ष शिवाजी फिरके, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अक्षय खेडेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.