दहावी च्या विद्यार्थ्यांना कला क्रीडाचे २५ ऐवजी कमाल १५ गुणच मिळणार
मुंबई : दहावी च्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत देण्यात येणारे कला,क्रीडा क्षेत्राचे २५ गुणांऐवजी १५ गुणच देण्यात येतील ,असे जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी दहावी च्या विद्यार्थ्यांना कलाक्रीडा क्षेत्राचे कमाल गुण २५ देण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढत होती,परंतु गुणवत्ता नाही. परंतु हेच २५ गुणांऐवजी ३ ते१५ गुणच दिले जाणार आहेत. तसेच ११वी च्या प्रवेशासाठी कलाकार कोटा सुद्धा रद्द करण्यात आला आहे.असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतले आहे.