वन्य प्राण्यांपासून नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- मा. आमदार सत्यजित पाटील
शाहूवाडी प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वन प्राण्याकडून मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे . पिकांचे नुकसान होत आहे शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत. याची वनविभागाने गांभीर्याने दखल घ्यावी व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर येथे रस्ता रोको करण्यात आला .
जवळपास दोन तास वाहतूक रोखून धरली होती .विठ्ठल मंदिर मलकापूर येथे हा रस्ता रोको करण्यात आला याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .
.याबाबत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की ,तालुक्यातील जनता नेहमीच वन विभागाला सहकार्य करत आहे. वन हद्दीतील जनावर शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीमध्ये येऊन नुकसान करत आहेत. शेतकऱ्यांवर हल्ले करत आहेत. यासाठी त्या वन्य प्राण्यांना रोखण्याची जबाबदारी वन विभागाची असताना, मात्र त्याकडे चाल ढखल केली जात आहे. शासन हे शेतकऱ्यांची बाजू न घेता, वन्य प्राणी कसे वाचतील, याकडे विशेष लक्ष देत आहे त्यांना माणसापेक्षा जनावरांची किंमत अधिक वाटत आहेत. जनतेची काळजी नसणार हे सरकार आहे. या सरकारला जाब विचारण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. यापुढे आपण स्वसंरक्षण करूनच आपली ताकद सरकारला दाखवून देऊया. .
यावेळी भाई भारत पाटील म्हणाले की, शाहुवाडी तालुका हा वन प्राण्यांच्या हल्ल्याने बेजार झाला आहे. शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी वन विभागाने तात्काळ प्रभावी उपाय योजना राबवावी.
. यावेळी तालुका प्रमुख दत्ता पवार ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी ,माजी सभापती विजय खोत ,दत्ता पवार तालुका उपप्रमुख दिनकर लोहार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी माझी सभापती जालिंदर पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
