सामाजिक

बांबवडे चे मा. ग्रा.पं.सदस्य बजरंग कांबळे यांचे निधन : जलदान विधी दि.२० जुलै.२०२३ रोजी

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पांडुरंग कांबळे यांचे काल दि. १८ जुलै २०२३ रोजी निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने बुद्धवासी बजरंग पांडुरंग कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जलदान विधी उद्या दि.२० जुलै २०२३ रोजी सकाळी ९.०० वा. बांबवडे इथं आहे.

बजरंग कांबळे हे हनुमान सह.दुध संस्थेचे चेअरमन होते, तर सह्याद्री युवा फौंडेशन चे संस्थापक होते. बजरंग कांबळे सहकार आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा नाव कमवून होते. याचबरोबर भजनाचा देखील त्यांना छंद होता. याचबरोबर त्यांना संगीताचे सुद्धा ज्ञान होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!