सामाजिक

गोगवे विद्यामंदिर चे विद्यार्थी थोडक्यात बचावले : मलकापूर एसटी चा बेजबाबदारपणा कारणीभूत ?

बांबवडे : गोगवे प्राथमिक विद्यामंदिर तालुका शाहुवाडी ची सहल परत येत असताना, बोरगाव – नागठाणे जि. सातारा जवळ एसटी बस ने अचानक पेट घेतला. परंतु चालक आनंदा कोळेकर यांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी मलकापूर तालुका शाहुवाडी एसटी आगाराला भेट देऊन यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी केली, आणि तसेच असा प्रकार पुन्हा घडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचा इशारा देखील दिला आहे.


मलकापूर एसटी आगार म्हणजे बेजबाबदारी चा कळस झाला असून, येथील आगार प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. काही दिवसांपूर्वी सरूड येथील शाळेची देखील सहल गेली होती. दोन दिवसांच्या सहलीत बस तीन वेळा बंद पडल्याची माहिती मिळत आहे. येथील बस जेंव्हा सहलीला पाठवल्या जातात,तेंव्हा तांत्रिक तपासणी होत नाही का ? होत नसेल तर काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोण उचलणार ? असा प्रश्न देखील जनतेतून होत आहे.


याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, गोगवे प्राथमिक विद्यामंदिर ची सहल ३० व ३१ जानेवारी २०२४ रोजी नारायणपूर, जेजुरी, मोरगाव, ठेवूर, आळंदी, ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, देहू, पुणे अशा मार्गावर सहल गेली होती. सहल आटोपून परत येत असताना, मध्यरात्री च्या दरम्यान चालक कोळेकर यांना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना बस मधून खाली उतरविण्यास सांगितले. बस मधून विद्यार्थी उतरल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात बस ने पेट घेतला. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी अग्निशमन गाडी बोलावली परंतु तोपर्यंत बस जाळून खाक झाली होती.


मलकापूर एसटी आगार म्हणजे बेजाबाब्दारीचा कळस झाला असून, येथील आगार प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. काही दिवसांपूर्वी सरूड येथील शाळेची देखील सहल गेली होती. दोन दिवसांच्या सहलीत बस तीन वेळा बंद पडल्याची माहिती मिळत आहे. येथील बस जेंव्हा सहलीला पाठवल्या जातात,तेंव्हा तांत्रिक तपासणी होत नाही का ? होत नसेल तर काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोण उचलणार ? असा प्रश्न देखील जनतेतून होत आहे.


गोगवे सहली बाबत पालकांनी एसटी आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.व तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.


या निवेदनावर लोकनियुक्त सरपंच मानसिंग पाटील, माजी सरपंच विकास पाटील, अध्यक्ष रा.न्य. स. राजराम माने, आनंदा पाटील सदस्य, संदीप पाटील पालक, कुसुम माने पालक, शुभांगी पाटील पालक, जयश्री माने पालक, नितीन कांबळे सदस्य, संतोष माने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सागर पाटील सदस्य, राकेश नांगरे उपाध्यक्ष श. समिती., पांडुरंग कांबळे, विजय पाटील या मंडळींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!