गुन्हे विश्वसामाजिक

खुटाळवाडी च्या ” खाडाखोड ” प्रकरणाबाबत पोलीस कारवाई कधी ?- श्री संतराम किटे

बांबवडे : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायत च्या कार्यालयातील दप्तरात तेथील कर्मचारी किसन आण्णा किटे यांनी खाडाखोड करून चुकीच्या नोंदी केल्याची तक्रार ग्रामस्थ संतराम बापू किटे यांनी केली होती. त्याबाबत किसन किटे यास शाहुवाडी पंचायत समितीने पाच हजार रुपयांचा दंड शिक्षा म्हणून केला गेला.


याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील कर्मचारी किसन किटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कामास असलेल्याचा गैरफायदा घेवून दप्तरात खाडाखोड करून चुकीची लिखापड केली असल्याचे निदर्शनास आले असल्याची . माहिती श्री संतराम किटे यांनी माहिती च्या अधिकाराखाली मिळवलेल्या कागदपत्रांवरून निदर्शनास आले.


याबाबत अधिक चौकशी करून शाहुवाडी पंचायत समिती ने कारवाई करून त्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. सदर चा दंड किसन किटे यांनी भरला आहे.


याबाबत खुटाळवाडी ग्रामपंचायत च्या ग्राम्सेवक यांच्याशी संपर्क साधला असता, सदर ची घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले. सदर घटनेबाबत शाहुवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. परंतु किसन किटे यास अद्याप अटक केली नसल्याचे समजते. याबाबत त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी श्री संतराम किटे यांनी केली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!