aamchyabaddalराजकीयसामाजिक

पांडुरंग आबा शाहुवाडी तालुक्यातील “भगवं वादळ” – वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील भाजप चे तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग हरिबा वग्रे आणि मित्र वर्गाचे आबा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज व मुकुंद पवार परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.


पांडुरंग वग्रे हे व्यक्तिमत्व म्हणजे शाहुवाडी तालुक्यातील “भगवं वादळ” आहे. परंतु काही मंडळींना हे उमजलंच नाही. सध्या ते भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. परंतु शाहुवाडी तालुक्यात शिवसेना पक्ष वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पांडुरंग आबा हे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व शिवसेनेला लाभलं होतं, परंतु त्यांना त्याची किंमत लागली नाही. हे त्यांचं दुर्दैव होतं. एक प्रामाणिक आणि निष्ठावान व्यक्तिमत्व काही काळ शांत होतं. त्या काळात पदरचे पैसे खर्च करून शिवसेना त्यांनी वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. वाडी-वस्तीवर पोहचून शिवसेना रुजविण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर सामाजिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. हे त्यांच्या अनेक आंदोलनातून लोकांनी पहिले आहे. कधी विजेचा प्रश्न तर कधी लोड शेडींग सारखे अनेक प्रश्न जनतेसाठी त्यांनी उचलून धरले होते. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रांत वादाबाबत देखील त्यांनी सक्रीय आंदोलन केले होते. अशा जनतेच्या अनेक प्रश्नांमधून त्यांनी आपलं व्यक्तिमत्व जोपासलं आहे. असो.


परंतु सध्या ते भारतीय जनता पार्टी मध्ये सहभागी झाले आहेत.इथं सुद्धा ते सक्रीय असून प्रामाणिकपणे आपला पक्ष रुजविण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशा या आमच्या मित्रांना त्यांच्या राजकीय वाटचालीत भरपूर यश मिळो, ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप सदिच्छा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!