25 किलोमीटर अंतराचे कंपाऊंड चा तत्काळ प्रस्ताव सादर करा -आम.मानसिंग नाईक
शिराळा /प्रतिनिधी :-
प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीलगतच्या असणाऱ्या रीळे गावासह नऊ गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून 25 किलोमीटर अंतराचे कंपाऊंड करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे तात्काळ करण्याच्या सूचना वण विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हा परिषद चे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी दिल्या.
शिराळा येथील प्रादेशिक वन विभाग कार्यालय येथे वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवांमुळे शेती व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानी बाबत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विस्ताराने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राण्यांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चेक वितरण करण्यात आले. आमदार मानसिंगराव नाईक,माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक ,सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण सांगली डॉ.अजित कुमार साजने, वनक्षेत्रपाल शिराळा एकनाथजी पारधी यांची प्रमुख उपस्थित होती.
शिराळा तालुक्यामध्ये प्रादेशिक वन विभागाच्या हद्दी लगत असणाऱ्या गावांमधील व वन्यप्राण्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात उपद्रव होत असल्यामुळे बिबट्या, गवे व रानडुकरांच्या पासून होणारे हल्ले व त्यामुळे शेतीचे होणारे प्रचंड नुकसान यामुळे गोरगरीब व शेतकरी जनता अडचणीत आली आहे. शेतीसाठी मुबलक पाणी असताना वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे शेकडो एकर क्षेत्र बाधित झाले आहे. ही शेतकऱ्याला न परवडणारे आहे.
वन्य प्राण्यांच्या कडून झालेले नुकसाननीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी विना विलंब तात्काळ करणे यावे व शेतीचे झालेले नुकसान कमी उंचीचे असले तरी संपूर्ण पिकाची भरपाई देण्यात यावी व प्रादेशिक वनक्षेत्रा मध्ये सोलर बोर घेऊन पाण्याची व वन्यप्राण्यासाठी चाऱ्याची व्यवस्था तातडीने करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवण्याचे अधिकाऱ्यांना यावेळी सूचना करण्यात आल्या. प्रादेशिक वनविभागाकडे नुकसान भरपाईची असणारी 388 प्रलंबित प्रस्तावापैकी 180 लाभार्थ्यांना दोन दिवसात नुकसान भरपाई मिळणार असून उर्वरित 168 लाभार्थ्यांना नुकसान भरपाईचे प्रस्ताव 31 जुलैपर्यंत मंजूर करून नुकसान भरपाई चे चेक अदा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रीळे गावालगत असणाऱ्या प्रादेशिक वन विभागाच्या हद्दी लगत कंपाउंड करण्यासाठी बारा किलोमीटरचा प्रस्ताव तयार असून उर्वरित गावांच्या हद्दीचा प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी पाठवून द्या. .त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यासाठी मी व रणधीर नाईक शासन स्तरावर पाठपुरावा करणार असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी मंनदूर सरपंच वसंत पाटील ,रीळे सरपंच बाजीराव पाटील, बिउर माजी सरपंच उत्तम पाटील, जयवंत मुदगे, दीपक पाटील, माजी सरपंच मिलिंद खामकर, शामराव सपकाळ, शंकर पाटील, आनंदा जाधव, दत्ता पाटील, लालासो पाटील, नारायण सुतार, जालिंदर पाटील, रामभाऊ पाटील वनक्षेत्रपाल एकनाथजी पारधी ,वनपाल अनिल वाजे, सुभाष पाटील, विक्रम गवळी, प्रादेशिक वनविभागाचे सर्व अधिकारी वनपाल व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.