आंबा येथील तळवडे जवळील अपघातात ६ ठार, तर २ गंभीर जखमी
मलकापूर प्रतिनिधी : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील तळवडे तालुका शाहुवाडी येथील वळणावर गणपतीपुळेला जात असलेल्या भरधाव पेंन्ट्रो गाडी झाडावर आदळनू झालेल्या भीषण अपघातात पुणे येथील गाडी चालक प्रशांत सदाशिव पाटणकर वय 40 वर्षे रा. भागीरथी हाऊस पिंपळे गुरव पुणे , संतोष त्र्यंबक राऊत वय 37 वर्षे रा.शेवाळेवाडी हडपसर पुणे , स्नेहल उर्फ अपर्णा संतोष राऊत वय 32 वर्षे रा.शेवाळेवाडी हडपसर पुणे, स्वानंद संतोष राऊत वय 5 वर्षे रा.शेवाळेवाडी हडपसर पुणे , दिपक बुधाजी शेळकंदे वय 40 वर्षे ,रा साई लक्ष्मी सुपर मार्केट दिघी पुणे , वरूण दिपक शेळकंदे वय 3 वर्षे रा साई लक्ष्मी सुपर मार्केट दिघी अशी दोन कुंटूबांतील दोन लहान मुलासह आई वडील असे सहा जण ठार तर वरूणा दिपक शेळकंदे वय 40 वर्षे व यज्ञा दिपक शेळके वय 3वर्ष असे दोघे जण गंभीर जखमी झाल्याची नोंद शाहुवाडी पोलीसांत झाली आहे .हा अपघात शुक्रवार 26जानेवारी रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास घडला.
पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीनुसार पुणे येथील संतोष त्र्यबंक राऊत , दिपक बुधाजी शेळकंदे , प्रशांत सदाशिव पाटणकर हे तिघेही यार्डी सॉफ्टवेअर सोशल पार्क, सेनापती बापट मार्ग, पुणे, येथे एकत्र काम करत होते. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने ते सर्वजण गणपतीपुळे येथे निघाले होते. या गाडीत संतोष राऊत त्यांची पत्नी स्नेहल राऊत व मुलगा स्वानंद राऊत त्याच बरोबर दिपक बुधाजी शेळकंदे, वरूणा दिपक शेळकंदे ,वरूण दिपक शेळकंदे, यज्ञा दिपक शेळकंदे हे एकत्र पेंट्रो गाडीतून जात होते .गाडीचे चालक प्रशांत सदाशिव पाटणकर हे होते .
दरम्यान अपघातस्थळी पोलीस अधिक्षक संजय मोहीते , डी. वाय. एस. पी. आर. आर. पाटील यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्यासह सहा.फौ.प्रशांत यम्मेवार,पो.कॉ. रामचंद्र दागंट, भरत मोळके, धनाजी सराटे, विश्वास चिले, एफ आय पिरजादे, संजय जाणकर, आदी सह स्थानिक अपघातग्रस्त पथकाचे राजेंद्र लाड , कृष्णा दळवी ,पोलीस पाटील गणेश शेलार, दत्तात्रय घोमाडे ,लक्ष्मण घावरे, मारूती पाटील, महेंद्र वायकुळ, दत्तात्रय पाटील, निलेश कामेरकर, शंकर डाकरे, आदीनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली .