गुन्हे विश्व

अर्चना नांगरे आत्म्हत्त्ये प्रकरणी सासरच्यांना पोलीस कोठडी

शिराळा : येथील करमाळे(ता.शिराळा )येथील अर्चना विनोद नांगरे(२३ )या विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात येणार आहे.हि घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या पूर्वी घडली .याबाबत पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी ,मयत अर्चना यांचा विवाह १९ एप्रिल २०१५ रोजी झाला होता.सहा महिने सासरचे लोक चांगले वागले ,त्यानंतर तुला स्वयंपाक करता येत नाही,तू व्यवस्थित वागत नाहीस, व्यवस्थित काम करत नाही, .लग्नात मानपान केले नाही. म्हणून आत्ता नवऱ्याला मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार व दोन तोळ्याची चैन माहेरून आण, म्हणून सासरच्या लोकांनी तिला मारहाण ,शिवीगाळ केली. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.त्यांचा तो छळ असाह्य झाल्याने तिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत अर्चनाच्या आईने दिली आहे.या प्रकरणी पती विनोद हनमंत नांगरे (२६ ),सासरा हनमंत गणपती नांगरे (५९ ),दीर संभाजी हनमंत नांगरे (२३ ),यांना पोलिसांनी अटक करून शिराळा न्यायालयात हजर केले.त्यांना शुक्रवारी ८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोन्गडे करत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!