अभिजीतची मृत्यूशी झुंज अखेर व्यर्थ ठरली
मलकापूर प्रतिनिधी
अखेर अभिजितची मृत्यूची झुंज व्यर्थ ठरली सहा दिवस मृत्यूशी झूंज देणार्या अभिजित कुंभारची बुधवारी 20 डिंसेबर रोजी प्राणज्योत मालवली आणि एक मनमिळावू हसरा चेहरा काळाच्या पडद्या आड गेला. आई वडिलांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा ह्रदय पिळवटून टाकत होता.
मलकापूर : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील अभिजित दिनकर कुंभार वय 15 हा रयत शिक्षण संस्थेच्या मलकापूर हायस्कूल, मलकापूर मध्ये इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी गुरूवारी दिवसभर आपल्या संवगडी मित्रासह शाळेत रमला होता. सायंकाळी घरी येऊन दिवसभराच्या आठवणीत रममानन होऊन नव्या दिवसाची, नवी स्वप्ने आणि नव्या उमेदीन रात्री झोपी गेला. .आणि ती मध्यरात्रच त्याची काळ रात्र ठरली. गडद झोपेत असलेल्या अभिजीतच्या गळ्यालाच दोन ठिकाणी सर्पदंश झाला. अचानक झालेल्या या जिवघेण्या हल्ल्याने अभिजित घाबरला. आरडाओरडा करताच घरातील माणसं जागी झाली. क्षणात अभिजितला ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं, पण गंभीर अवस्था असल्या कारणान, त्याला कोल्हापूरला दाखल करण्यात आले होते.
सह दिवस अभिजितवर खाजगी रूग्णालयात उपाचार सुरू होते. सहा दिवस मृत्यूशी त्याने झुंज दिली. आई वडिलांसह नातेवाईकाना ही आशेचा किरण दिसत होता . अभिजित पुन्हा एकदा आपल्या अंगणात बागडेल, आणि आपल्या मित्रपरिवारासह नातेवाईकांच्यात पुन्हा रमेल. या वेड्या आशेवर नातेवाईकासह डॉक्टरांनी ही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अखेर नियतीने डाव साधला, आणि एक हसरा मन मिळावू , शाळेत हुशार आणि मित्राना हवाहवासा वाटणारा गुरुजनांचा लाडका अभिजित बुधवारी अनंतात विलीन झाला .
====अंत्ययात्रेत मित्रपरिवार गहीवरला===
अभिजीतला सर्पदंश झाल्याचे समजल्या पासूनच त्याचा मित्रपरिवार काळजीत पडला होता. आमचा मित्र लवकर बरा व्हावा, यासाठी देवा कडे धावा करणारे मित्र अभिजीतच्या मृत्यूची बातमी समजताच हवालदिल झाले. अंत्ययात्रेत जड पावलानी आपल्या मित्राला अखेरचा निरोप देताना, त्यांच्या डोळ्यातून पडलेले अश्रू अनेकांचे ह्रदय हेलावून टाकत होते .
कुटूंबासह संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले, तर आपला एक मित्र आपल्यातून निघून गेल्याचं दुःख अभिजितच्या मित्र परिवाराच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विनायक कुंभार व विद्यामान नगरसेविका सौ संगीता विनायक कुंभार यांचा तो पुतण्या, तर मलकापूर हायस्कूल मलकापूरचे कर्मचारी दिनकर कुंभार यांचा तो मुलगा असून, त्याच्या पश्चात आई, वडील ,भाऊ, चुलते , चुलती असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार 21 डिसेंबर रोजी मलकापूर येथे आहे .