” दुध रोको ” च्या निमित्ताने महादेवाला अभिषेक : शासनाला सुबुद्धी मिळो,हि प्रार्थना
बांबवडे : साळशी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधव यांच्यावतीने महादेवाला दुग्धाभिषेक घालण्यात आला. देवेंद्र शासनाला देवो सद्बुद्धी देवो, आणि बळीराजा सुखी होवो, यासाठी हा अभिषेक करण्यात आला.
आजपासून शासनाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ” दुध रोको आंदोलन ” राज्यभर सुरु झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गायी, म्हैशींचे दुध आपल्या मुलाबाळांना खाण्यापिण्यासाठी ठेवावे , अथवा देव-देवतांना अभिषेक करावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील, तसेच अमर पाटील, सतीश पाटील यांनी साळशी इथं महादेवाला दुग्धाभिषेक केला, आणि शासनाला सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना संघटनेच्या वतीने महादेवाला करण्यात आली.
यावेळी संघटनेचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.